अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील करपा रोगाचे नियंत्रण!
➡️शेतकरी बंधूंनो, टोमॅटो पिकामध्ये पानावरील करपा रोग अल्टरनेरीया सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे होतो. ➡️सुरवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान गोलाकार ते आकारहीन, तपकिरी ते काळपट रंगाचे वलयांकित ठिपके. प्रादुर्भाव वाढून ठिपके एकमेकात मिसळून मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पानावर तयार होतात. यामुळे पाने करपून गळतात. ➡️टोमॅटो पिकामध्ये, पानांवरील करपा आढळून आल्यास , त्याच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅनकोझेब 63% डब्ल्यू पी @ 40 ग्रॅम / पंप व कासुगामायसिन 3% एस एल @ २५ मिली / पंप यांची एकत्रित फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
43
12
संबंधित लेख