अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकातील हुमणी किडीचे नियंत्रण!
या कीडीची अळी नुकसानकारक असून सुरुवातीचे काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर उपजीवीका करते. पुढे मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरतडल्याचे दिसून येते. मुळे कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडते. रोपे वाळू लागतात. उपटल्यास ती सहज उपटून येतात . नियंत्रण :- 👉 हळद लागवडीनंतर हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास शिफारस केलेल्या औषधाच्या द्रावणाची आळवणी करावी. 👉 आळवणी शक्य नसल्यास जमिनीमध्ये शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा. 👉 जैविक नियंत्रणासाठी मेटॅरायझिम अनासोप्ली ही परोपजीवी बुरशी हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
41
6
संबंधित लेख