व्हिडिओप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सर्वसामान्य कर्जदारांना दिलासादायक बातमी!
👉 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आदेशानंतर आता सर्व बँका आणि एनबीएफसी ग्राहकांना लवकरात लवकर व्याज माफीचा लाभ देणार आहेत. 👉 वास्तविक, आरबीआयने सर्व कर्ज देणाऱ्या संस्थांना मंगळवारी दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या व्याज माफी योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 👉 योजनेंतर्गत १ मार्च २०२० रोजी दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावरचे व्याज सहा महिन्यांसाठी माफ केले जाईल. 👉 पात्र कर्ज खात्यांसाठी चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरक अदा करण्यासाठी सरकारने २३ ऑक्टोबर रोजी अनुदान योजना जाहीर केली. 👉 चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यातील फरक ५ नोव्हेंबरपर्यंत सरकारने कर्जदारांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले होते. 👉 तर अशीच सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
100
5
संबंधित लेख