कृषी वार्तामहाभरती
डिसेंबरनंतर २५ हजार पदांची मोठी पोलिस भरती!
"महाराष्ट्र पोलीस भरती २०२० – २०२१ : तरुणांनो, लागा तयारीला! सरकार पोलीस खात्यातील पंचवीस हजार पदं भरणार! मित्रांनो, आत्ताच प्राप्त बातमी नुसार पोलीस भरती लवकरच डिसेंबर २०२० मध्ये अपेक्षित आहे. रिक्‍त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी आणि अपडेट्स सुरु आहेत. राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्‍त होतात. २०१९ आणि २०२० मध्ये पोलिस भरती झालेली नाही. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे. सध्या राज्यातील पोलिसांचे काम वाढलेलं आहेत, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या काळातील रिक्‍त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. पोलीस भरती २०२० संदर्भातील महत्वाचे मुद्दे आम्ही देत आहोत : 👉 आगामी दोन वर्षांची एकत्रित राबविली जाणार भरती प्रक्रिया 👉 आरक्षणनिहाय माहिती काढण्याचे काम सुरु असल्याची सूत्रांची माहिती 👉 कोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्‍त झाली पदे 👉 भरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षणचे अप्पर पोलिस महासंचालकांनी मागविली पोलिस शिपाई व चालक शिपायांची माहिती. 👉 २०१९ आणि २०२० मध्ये भरती न झाल्याने साडेबारा हजार जागा झाल्या रिक्‍त. 👉 या सर्व अनुषन्गाने असे लक्षात येते कि डिसेंबर २०२० नंतर सुमारे २५ हजार रिक्‍त पदांची पोलीस भरती राबविण्यात येईल असे चित्र आहे. अधिक माहितीसाठी येथे 👉 https://mahabharti.in/police-bharti-2020-2021-apply-online/ क्लिक करा."
संदर्भ:- महाभरती., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
2
संबंधित लेख