कृषी वार्तासकाळ पेपर
हमीभावाने मक्‍याच्या 🌽 विक्रीसाठी ऑनलाइन नावनोंदणी सुरु!
जिल्ह्यात यंदा तब्बल सर्वाधिक दोन लाख ३७ हजार हेक्‍टरवर मका पीक आहे. मकाला सध्या बाजार समित्यांसह खासगी बाजारात एक हजार ते एक हजार २५०, तर सरासरी एक हजार १०० रुपये दर मिळत असून, चालू हंगामातील उत्पन्न देणारे मक्याचे पहिले पीक निघाल्याने शेतकरी आर्थिक अडचण भागविण्यासाठी या अल्प भावातही मक्‍याची विक्री करताना दिसतोय. 👉 शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करा सध्या मोठ्या मक्याची सर्वत्र काढणी झाली असून, अनेक ठिकाणी पावसाचा फटकाही मक्याला बसला. बिट्या ओल्या होऊन कोंब फुटले आहेत. तरीही मोठ्या प्रमाणात दर्जेदार उत्पादन यंदा जिल्ह्यात झाल्याने शेतकऱ्यांना हमीभावाच्या खरेदीची आस आहे. यंदा हमीभावात वाढ करून १८५० रुपये दराने खरेदीचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याने मोठा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार आठ खरेदी केंद्रांना यंदा मका, ज्वारी बाजरी व रागी खरेदीचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार या केंद्रावर १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत खरेदी होईल. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करायची आहे. 👉 या केंद्रांना मिळाली परवनागी जिल्ह्यातील सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, लासलगाव येथे तालुका सहकारी खरेदी-विक्री संघांना, तर नांदगाव येथे शनेश्वर तालुका संघ, मालेगाव येथे शेतकरी सहकारी संघ, सटाणा येथे दक्षिण भाग विकास सोसायटी या आठ संस्थांना हे भरडधान्य खरेदीची परवानगी मिळाली आहे.
35
10
संबंधित लेख