सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, हळद पिकातील फुल काढावे कि काढू नये?
• शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर हळदीला फुले येण्यास सुरवात होते. काही जातींना मोठया प्रमाणात, तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. • हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरवात झाल्याचे लक्षण आहे. • फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. • फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक आहे. संशोधनानुसार असे निदर्शनास आले आहे की, हळदीवर फुलांचे दांडे असल्यामुळे उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट झालेली नाही. • फुलांचे दांडे ही न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी ते नव्याने येत राहतात. • फुले काढताना खोडाला इजा झाली, तर त्या भागातून बुरशींचा पिकात शिरकाव होऊन कंदकूज रोग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत.
संदर्भ - अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
3
संबंधित लेख