सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन!
• बटाटे लागवडीपूर्वी कीड विरहित व निरोगी असलेले बटाट्याचे बियाणे निवडावे म्हणजे शेतात किडींचे प्रमाण वाढणार नाही . • उगवणी नंतर येणाऱ्या रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी बटाटे बियाणे लागवडी पूर्वी इमिडाक्लोप्रिड (१७.८% एस.एल.) चार मि.लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून १० मिनिटे प्रक्रिया करावी व नंतर लागवड करावी . • शिफारशीनुसार योग्य अंतरावर लागवड करावी . • शेतकऱ्याने रोग प्रतिकारक जातींचीच लागवड करावी . • आठवड्यातून २ ते ३ दिवसांतून पिकाचे पाहणी करावी . • पिकांमध्ये तसेच कडेने सापळा पिके लावावीत . • रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतात पिवळ्या व निळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा . • पोकोळी , स्पोडेप्टेरा , देठ कुडतडणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी पिकास वेळेवर भर द्यावी . • कामगंध सापळ्यांचा वापर करावा . उदा . पाकोळी , स्पोडोप्टेरा , देठ कुडतडणारी अळी . • रस शोषणाऱ्या किडी विषाणुजन्य रोगांचा प्रसार करीत असतात. त्यामुळे पीक उगवणीनंतर झाडांची कोवळी पाने आणि शेंडेयांवर वेळेवर लक्ष ठेवून शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी . • बटाट्यावरील अळी वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये एकरी ६ ते ७ पक्षी थांबे उभारावेत . • पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा आणि देठ कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतात गवताचे लहान-लहान ढीग रात्रभर ठेवावेत . सकाळी अळ्यांसह गवताचे ढीग नष्ट करावेत . • पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा अळींचे अंडीपुंज दिसल्यास नष्ट करावेत . • पाने पिवळी पडल्यास अथवा पाने जाळीदार धरलेली असल्यास अशा पानांवर अळीपुंज असतात . ते नष्ट करावेत . • • पिकावर रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी पीक उगवल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव होतो. आर्थिक नुकसान पातळीनुसार शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
3
संबंधित लेख