अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकातील खोडकिडीचे नियंत्रण!
खोडकिडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असून दोन्ही पंखांवर काळ्या रंगांचे ठिपके असतात. अळी लालसर रंगाची असून, अंगभर काळे ठिपके असतात. अळी खोड व हळदीचे कंद पोखरते. खोडाला छिद्र करुन आत शिरते. आतील भाग खाऊन टाकते. पानांवर एका ओळीत छिद्र पडलेली दिसतात. नियंत्रण :- • प्रादुर्भावित झाडे नष्ट करावीत. • निंबोळी ५ मि.लि. प्रती लीटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. • प्रकाश सापळ्याचा एकरी एक या प्रमाणात वापर करावा. सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवावा. यामध्ये या किडीचे प्रौढ आकर्षित होतात, त्यांना नष्ट करावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-657&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
15
1
संबंधित लेख