सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील शेंग पोखरणाऱ्या अळीचा नुकसानीचा प्रकार व उपाय!
👉 किडीची ओळख - शेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा या नावाने ओळखली जाते. ही एक बहुभक्षी कीड असून १८१ प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करते. शेंगा पोखरणारी अळी साधारणपणे ७ ते १६ शेंगाचे नुकसान करते. पूर्ण विकसित अळी प्रामुख्याने पोपटी रंगाची असून यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. 👉 नुकसान- अळी लहान असतांना पानावर तर पीक फुलोऱ्यावर असतांना कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करते. ही अळी शेंगावर अनियमीत आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील परिपक्व तसेच अपरिपक्व दाणे खाते. 👉 नियंत्रण - या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी @६० मिली किंवा फ्लूबेंडामाईड ३९.३५% एससी @४० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी. हि उत्पादने खरेदी करण्यासाठीulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-470,AGS-CP-747&pageName=क्लिक करा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
8
संबंधित लेख