सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
🌶 मिरची पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी व्यवस्थापन!
मिरची पिकामध्ये सर्व अवस्थांमध्ये थ्रिप्स/फुलकिडी चा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीमध्ये पिकामध्ये चुरडा मुरडा/आकसा/बोकड्या येणे या समस्या उद्भवतात. यामुळे पिकाची वाढ खुंटली जाते व परिणामी उत्पादनात घट येते. 👉 याकिडीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५% एससी घटक असलेले कीटकनाशक @ ७५ मिली किंवा स्पिनेटोराम ११.७% एससी @१८० मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @८० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 👉 तसेच या फवारणी नंतर ४ दिवसांनी अधिक फुलधारणेसाठी अमिनो ऍसिड @२ मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात फवारणी करावी. व १२:६१:०० @२ किलो किंवा १३:४०:१३ @२ किलो प्रति २ ते ३ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे. पिकामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करावे. पाणी साचणार नाही याची व्यवस्था करावी. या उत्पादनांच्या खरेदीसाठी येथे ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-268,AGS-CN-072,AGS-CN-299&pageName= क्लिक करा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
136
20