अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
नुकसानकारक - तुरीच्या शेंगेवरची माशी..
तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी नंतर शेंगमाशी पिकाचे सर्वात जास्त नुकसान करते. शेंगामाशीची एक अळी शेंगेच्या आत राहून दाण्यांवर उपजीविका पूर्ण करते. अळी शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खात असल्यामुळे दाण्यांची मुकणी होते. परिणामी उत्पादनात घड येते. शेतकरी मित्रांनो या शेंगाच्या बाह्य निरीक्षणावरून या अळीच्या प्रादुर्भावाचे लक्षण दिसून येत नाही. पूर्ण विकसित अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडण्यासाठी शेंगेला छिद्र पाडते तेंव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. 👉नियंत्रणासाठी - लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५% ईसी @ १६० ते २०० मिली प्रति एकर फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
68
14
संबंधित लेख