अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकास रासायनिक खते वापरताना घ्यावयाची काळजी!
पिकास सर्व नत्रयुक्त खतांची मात्रा एकाच वेळी न देता पीक वाढीच्या अवस्थेत विभागून द्यावी. जेणेकरून नत्रयुक्त खतांचा ऱ्हास होणार नाही. पेरणीच्या वेळी खते आणि बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या साहाय्याने दिल्यास खते झाडाच्या मुळांच्या खालच्या थरात उपलब्ध होऊन पिकास अधिक फायदा होतो. रोपावस्थेत खते वापरताना खते रोपभोवती रिंगण पद्धतीने टाकावीत परंतु खतांचा रोपांशी प्रत्यक्ष संपर्क येऊ देऊ नये अन्यथा रोपे खराब होण्याची शक्यता असते. ओलसर खते वापरताना खते कोरड्या मातीत मिसळून द्यावीत.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
68
5
संबंधित लेख