अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकाच्या लागवडीसाठी महत्वाची माहिती!
• शेतकरी मित्रांनो, जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. • जिरायती परिस्थितीत देशी हरभरा झाडांची हेक्टरी संख्या योग्य राखण्यासाठी बियाणे चार तास पाण्यात भिजवून व नंतर सावलीत वाळवून बीजप्रक्रिया करूनच पेरावे. • ओलिताखाली हरभरा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी. • देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर ३० सें.मी., तर दोन झाडातील अंतर १० सें.मी ठेवावे. • काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी ठेवावे. • ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वाफ पद्धत वापरणे फायद्याचे ठरते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
76
12
संबंधित लेख