कृषी वार्ताकृषी जागरण
SBI आर डी योजना : एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा १.५० लाख रुपये मिळवा!
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणि नव नवीन सुविधा आणत असते. एसबीआयातील बचत खात्यासह इतर अनेक नवीन योजनांचा लाभ ग्राहक घेऊ शकणार आहेत. दरम्यान ग्राहक एसबीआयची आरडीचा योजनेचाही लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या अंतर्गत कमी गुंतवणूक करून आपण पैसा जोडू शकतात. काय आहे एसबीआय आरडीची योजना एसबीआयच्या आरडीसाठी आपण मात्र १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या गुंतवणुकीतून आपण साधरण १.५० लाख रुपये जोडू शकतात. किती मिळते व्याज १) एसबीआयमध्ये आपण एका ते १० वर्षापर्यंत आरडी करू शकतो. २) एक ते २ वर्षाच्या आरडीवर १० टक्के व्याज मिळते. ३) तीन ते ५ वर्षाच्या आरडीवर ३० टक्क्यांनी व्याज मिळते. ४) ५ ते १० वर्षाच्या आरडीवर ४० टक्के व्याज मिळते. दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत अधिक लाभ मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसबीआयच्या आरडीवर जास्त व्याज मिळत असते. या अंतर्गत १ ते २ वर्षाच्या आरडीवर ५.६० टक्के व्याज मिळते. तर यासह ३ ते ५ वर्षाच्या आरडीवर बँक ५.८० टक्के व्याज मिळते. यासह ५ ते १० वर्षाच्या आरडीवर ६.२० टक्के व्याज मिळते. कसे मिळणार १.५० लाख रुपये एसबीआयच्या आरडीमध्ये प्रत्येक महिन्याला १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणूकीत १० वर्षापर्यंत एक हजार रुपये आपल्या खात्यात टाकावे लागतील. यावर मिळणाऱ्या व्याजानुसार, ४० टक्क्यांच्या हिशोबानुसार १० वर्षात १.५० लाख रुपये मिळतील. संदर्भ - ३ ऑक्टोबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
119
6
संबंधित लेख