कृषी वार्ताकृषी जागरण
३० दिवसात ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आले २-२ हजार रुपये.
सरकारची सर्वाधिक लोकप्रिय झालेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी पडत आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत ही दोन हजार रुपयांच्या हप्त्या द्वारे केली जाते. दरम्यान या योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. काही दिवसांपुर्वी पीएम किसान योजनेच्या साहवा हप्ता देण्यात आला होता. गेल्या ३० दिवसात ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील महिन्यापर्यंत साधरण दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील अशी आशा आहे. दरम्यान मागील सप्टेंबर महिन्यात पीएम किसान योजनेसाठी १० कोटी ६५ लाख शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. घरी बसून जाणून घ्या लाभार्थ्यांची स्थिती कोणत्याही राज्यातील शेतकऱी आपल्या घरी बसून पीएम किसान योजनेची माहिती आणि लाभार्थ्यांची स्थिती जाणून घेऊ शकता. यासाठी खालील पद्धतीने कृती करावी. सर्वात आधी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जावे. यावर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल. होम पेजवर शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल. यात आपल्याला लाभार्थी स्थिती या पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. यात आपल्याला लाभार्थ्यांची स्थिती ची माहिती मिळेल. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. जर तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती पाहायची आहे. तर आपला आधार नंबर, मोबाईल नंबर, आणि बँक खाते क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांची माहिती मिळेल. स्व:ताची नोंदणी आणि सीएससी शेतकऱ्यांची स्थितीची माहिती आधी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ यावर जावे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल. या होम पेजवर शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल यात स्वयं नोंदणीकृत / सीएससी शेतकर्‍यांची स्थिती स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅच्चा कोड यादी गोष्टी भराव्यात. सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्य स्थितीची माहिती मिळेल. मोबाईल एपच्या मदतीने कसे तपासा सन्मान निधी योजनेची यादी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले जाते. याची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने मोबाईल अॅप सुरू केले आहे. या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही पीएम - किसान योजनेची माहिती मिळवू शकता. संदर्भ - ३ ऑक्टोबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
162
6
संबंधित लेख