कृषी वार्तालोकमत
एक झाड जगवा, १००० रुपये मिळवा, शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला अनुदान!
जुनी झाडे वाचविण्यासाठी प्रति झाड अनुदान देण्याची योजना लवकरच राज्यभरात जाहीर केली जाणार आहे. यात एक जुने झाड जगविल्यास शेतकऱ्याला वर्षाला हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पुढील आठवड्यात बैठकीनंतर ही योजना जाहीर केली जाईल. शेतात १०० सें.मी. घेर असणाऱ्या झाडांना प्रति झाड१०० रुपये तर ३०० सें.मी.पेक्षा जास्त घेर असणाऱ्या झाडांना प्रति झाड एक हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्याचे स्वरूप होते. हीच योजना आता राज्यभर राबविली जाणार आहे. गावातील वृक्षांनाही ही योजना लागू करावी, अशी शिफारस आहे. नवीन झाडे लावायला खूप खर्च येतो. पण जुन्या झाडांना काहीच खर्च नसतो. त्याचे जतन व्हायला हवे. म्हणून ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जुन्या झाडांच्या बिया जतन करून लावल्या तर त्याचे झाड चांगले येते. कारण ते पूर्वी चांगल्या वातावरणात वाढलेले असते. अशा जुन्या झाडांचा सर्व्हे राज्यभर सुरू आहे. झाडे किती आणि त्यासाठी किती अनुदान लागेल, याचा अंदाज या माध्यमातून घेतला जात आहे. संदर्भ - २७ संपत २०२० लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
177
10
संबंधित लेख