अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकातील सूत्रकृमीचे नियंत्रण!
हळद पिकामध्ये सूत्रकृमी पिकाच्या मुळांवर गाठी तयार करतात. जमिनीत मुळांभोवती राहून मुळातील रस शोषून घेतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, फुटव्यांचे प्रमाण कमी होते. सुरवातीला पिकाचा शेंडा मलून होतो. पीक पिवळे पडून झाड मरते. कालांतराने कीड कंदामध्ये प्रवेश करून कंद सडविते. सडलेले कंद तपकिरी रंगाचे दिसतात. किडीने केलेल्या जखमांतून रोगकारक बुरशी कंदात शिरते. त्यामुळे कंदकूज होते.  नियंत्रण • व्हर्टिसिलियम क्लायमेडोस्पोरीयम हे जैविक सुत्रकूमीनाशक @२ ते ४ किलो प्रति एकरी २०० ते २५० किलो शेणखतामध्ये मिसळून किंवा ठिबकद्वारे द्यावे. • भरणी करतेवेळी एकरी ८ क्विंटल निंबोळी पेंड वापरावी. • हळद पिकात झेंडूची सापळा पीक म्हणून लागवड करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
9
संबंधित लेख