सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम!
आपल्या शेतातील पिकांवर विविध किंडीचा प्रादुर्भाव होत असतो. किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकांशी विशिष्ट संबध असतो, सर्वसाधारणपणे किंडीची संख्या पावसाळ्यात जास्त असते. त्या मानाने ती हिवाळ्यात कमी तर उन्हाळ्यात त्यापेक्षाही कमी असते. परंतु सध्या बदलत्या हवामानामुळे किंडीचे प्रमाण वातावरणानुसार कमी अधिक प्रमाणात बदलत व अनियमित आहे. किडींच्या संख्येवर परिणाम करणारे हवामानातील घटक :- 1) तापमान (Temperature) : वातावरणातील खूप जास्त किंवा अति कमी तापमान हे किडीच्या जीवनक्रमावर परिणाम करतात. उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे भरपूर किडी मरतात, तर काही सुप्तावस्थेत जातात. उन्हाळ्यात अधिक तापमानामुळे किडींची संख्या कमी होते, अंडी देणे, चयापचय व जीवनवाढीच्या क्रिया मंदावतात. 2) प्रकाश (Light) : प्रकाश हा किडीमध्ये ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे. प्रकाश व अंधाराच्या आधारावर किडींचे मुख्य कार्य सुरळीत चालते. किडींच्या हालचाली, अंडी देण्याची क्षमता, वाढीचा स्तर, प्रजनन, अशा गोष्टींवर प्रामुख्याने प्रभाव पडतो. काही किडी फक्त अंधारातच अंडी देतात उदा. बोंड अळी, केसाळ अळी इ, तर काही किडींना अंडी देण्यासाठी प्रकाशाची गरज असते. उदा. फळमाशी. 3) आद्रता (Humidity) : पावसाळ्यात जास्त आद्रता बऱ्याच किडींना मानवते, तर हिवाळ्यात जशीजशी आद्रता कमी कमी होत जाते तशी किडींच्या संख्येत घट होते. हिवाळ्याच्या सुरवातीला म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये किडींचा सुळसुळाट असतो, परंतु नंतर वातावरण जसे जसे थंड होत जाते व आद्रता कमी कमी होत जाते तसे किडी निष्क्रिय होऊन सुप्तावस्थेत जातात. 4) पाऊस (Rainfall): अतिपावसामुळे भरपूर किडी पाण्याबरोबर धुतल्या जाऊन पाण्यासोबत वाहून जातात, परंतु तुरळक पडणारा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. ढगाळ वातावरण हे किडीसाठी पोषक समाजले जाते. त्यामुळे अळीवर्गीय किडी व रसशोषित किडी यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होतो. 5) वारा (Wind) : वाऱ्यामुळे किडी हवेसोबत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यामुळे किडींचा उपद्रव एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित होतो. अशाप्रकारे वातावरणातील विविध घटक किडींच्या जीवनक्रमावर बदल घडवून आणतात. वाढलेल्या किडींचा ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने बंदोबस्त केला तर कीड वेळीच नियंत्रणात येऊन आर्थिक नुकसान पातळीच्याखाली राखण्यात मदत होते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
4
संबंधित लेख