अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकाच्या लागवडीसाठी महत्वाची माहिती!
रब्बी हंगामातील भेंडी पिकाची लागवड थंडी सुरु होण्यापूर्वी केली जाते. भेंडीसाठी जमिनीची निवड करताना कसदार किंवा पोयट्याची, चांगल्या निचर्‍याची जमीन निवडावी. सेंद्रिय खतांचा वापर करावा. भेंडीला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये हे पीक चांगले येते. भेंडी लागवडीसाठी प्रथम जमिनीची नांगरट करून ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर उभ्या-आडव्या दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर प्रति हेक्टर २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे म्हणजे ते जमिनीत चांगले मिसळले जाईल. • लागवड - भेंडीची लागवड सरी वरंबा, तसेच पट्टा पद्धतीने करतात, परंतु सरी वरंबा पद्धत ही प्रचलित व अधिक उत्पादनासाठी उपयुक्त आहे. भेंडीची लागवड करताना ६० सेंमीवर सरी पडून सरीच्या दोन्ही बाजूस टोकण पद्धतीने ३० सेंमी अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी प्रति एकरी २ ते ३ किलो बियाणे वापरावे. बियाणे लागवडीनंतर भरपूर पाणी द्यावे, म्हणजे मातीच्या चांगल्या ओलाव्यामुळे उगवण चांगल्या प्रकारे होते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
38
5
संबंधित लेख