अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील फुलोरा ते दाणे भरणे अवस्थामध्ये घ्यावयाची काळजी!
भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा १७ किलो युरिया प्रति एकरी द्यावी. पावसाची उघडझाप, वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे माळ जमिनीवर असलेल्या हळव्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीच्या अळ्या दिवसा फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात. रात्री पाने व लोंब्या कुरतडून खातात. त्यांच्या नियंत्रणासाठी भात पिकात एकरी तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत. सकाळी किंवा सायंकाळी भात पिकातअळीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरपायरीफॉस (१.५ टक्के भुकटी) ८ किलो प्रति एकरी सायंकाळी किंवा सकाळी वारा शांत असताना पर्यावरण व स्वसुरक्षेची काळजी घेऊन व्यवस्थित धुरळणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
26
11
संबंधित लेख