अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळदीच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
हळद पिकाच्या जोमदार वाढ, फुटवे व कंदाच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक असते. हळदीच्या लागवडीनंतर १०-१५ दिवसांनी १९:१९:१९ @३ ग्रॅम + चीलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम + चिलेटेड झिंक @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी चिलेटेड फेरस @१ ग्रॅम + चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ४ महिन्यांनी ००:५२:३४ @५ ग्रॅम + चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ६ महिन्यांनी २-३ वेळेस ००:५२:३४ @५ ग्रॅम + बोरॉन @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर ८ महिन्यांनी ००:००:५० @५ ग्रॅम + चिलेटेड कॅल्शियम @१ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
88
37
संबंधित लेख