अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब तडकू नयेत यासाठी काय आहेत उपाय, जाणून घ्या.
• शेतकरी बंधूंनो, डाळिंब बागेत सुक्ष्म अन्न द्रव्ये लोह, किंवा बोरॉनची कमतरता असल्यास सुक्ष्म अन्न द्रव्ये स्लरी द्वारे एकरी २०० लिटर पाण्यामध्ये २५ किलो ताजे शेण ५ लिटर गोमूत्र ५ किलो फेरस सल्फेट ५ किलो झिंक सल्फेट २ किलो बोरिक अॅसिड एकत्र आठवाडाभर सातव्या दिवशी झाडांना स्लरी द्यावी. • जमिनीच्या पोतानुसार पाण्याचे नियोजने करावे. ठिंबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा. • पाण्याचा नियंत्रित वापर करावा, डाळिंबास जास्त पाण्याचा वापर करुन नये. • तांबड्या, हलक्या जमिनीत कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यास बोरॉनची फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची असताना करावी. • फळांची फुगवण तसेच रंग चव चांगली येण्यासाठी फळ पक्कतेच्या काळात पोटॅशिअम शोनाईट २ किलो २०० लिटर पाण्यातून ठिबक द्वारे किंवा फवारणीद्वारे १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ वेळा द्यावे
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
29
8
संबंधित लेख