अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
शेतकरी बंधुनो, वांगी पिकामध्ये फळ आणि शेंडा पोखरणारी कीड सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते. योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत, तर हे नुकसान ८० टक्क्यापर्यंत जावू शकते.त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त शेंडे व फळे आढळून आल्यास काढून नष्ट करावीत.पीक फुलोऱ्यावर यायच्या अगोदर एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. रासायनिक नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २० ईसी @ १ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी@ ०.४ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
61
22
संबंधित लेख