कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
स्मार्ट'च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना राज्यात प्रारंभ
पुणे – कृषी खात्याच्या स्मार्ट प्रकल्पातून आतापर्यंत 28 पथदर्शक प्रकल्पांचा विस्तार कामांना सुरूवात झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात 53 कोटी रू. अनुदान वाटले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शेतकरी संस्थासाठी http:www.smart-mh.org या संकेतस्थळावर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 300 शेतकरी संस्था तसेच 140 भागीदार संस्थांनी नोंदणी केली आहे. 60% पर्यंत अनुदान या प्रकल्पनातून मिळणार आहे. राज्यातील शेतकरी समूहाच्या कृषी व्यापाराला चालना देणे व छोटया शेतकऱ्यांना समृध्दीकडे नेणे हे मुख्य हेतू या प्रकल्पाचे आहे. प्रकल्पासाठी संस्थांना त्यांचे भांडवले गुंतवणे बंधनकारक आहे. त्यासाठी बॅंकाकडून प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शासनाने 2100 कोटी रू. खर्चाच्या स्मार्ट अर्थात महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची प्रमुख अंमलबजावणी कृषी खात्याकडे दिली आहे. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, 17 सप्टेंबर 2020
223
4
संबंधित लेख