कृषी वार्तापीआयबी इंडिया
लोकसभेत दोन महत्त्वाची कृषी विधेयक मंजूर!
नवी दिल्ली – शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२० शेतमाल हमी भाव व शेती सेवा करार (सबलीकरण व संरक्षण) विधेयक, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरूस्ती) विधेयक, २०२० हे गुरूवारी लोकसभेत मंजूर झाले. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, आता शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल. शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल, एमएसपी कायम राहील. कर न लावल्यामुळे शेतकर्‍यांना अधिक भाव मिळेल आणि नागरिकांनाही कमी किंमतीत मालही मिळेल. खासगी गुंतवणूकीमुळे शेतीला गती येईल, रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल. मोदी यांनीदेखील ट्विट करताना म्हटले आहे की, ही दोन्ही बिले एक ऐतिहासिक क्षण आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण क्षण आहे. ही विधेयके शेतकऱ्यांसाठी चांगली आहेत. मध्यस्त आणि सर्व अडचणीतून आता शेतकऱ्याची सुटका होणार आहे. जय किसान, असे मोदी यांनी म्हटले आहे. ही दोन्ही बिले कृषी क्षेत्रात संपूर्ण बदल घडवून आणतील, शेतकऱ्यांच्या जीवनात एक क्रांतिकारक बदल घडवून आणतील. शेतीत खासगी गुंतवणूकीमुळे वेगवान वाढ होईल आणि रोजगाराच्या संधीही वाढतील, कृषी क्षेत्राच्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे देशाची आर्थिक स्थिती आणखी सुधारेल, असे केंद्र सरकारच्यावतीने यावेळी सांगण्यात आले आहे.
109
6
संबंधित लेख