कृषी वार्ताकृषि जागरण
अरे वा! बाइक इंजिनने बनविला मिनी ट्रॅक्टर!
जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त मनात काही तरी करण्याची प्रभळ इच्छा पाहिजे. नुकतेच याचे एक नवोदित उदाहरण हरियाणा येथे पाहायला मिळाले. हरियाणा येथील ताहली गावातील शेतकरी दिलबाग संधू यांचा 16 वर्षाचा मुलगा मेहर सिंग याने एवढया लहान वयात भल्या हुशारीने बाइकच्या इंजिनने एक मिनी ट्रॅक्टर तयार केले आहे. मेहर सिंह हा डिझेल मॅकेनिकलचा विद्यार्थी आहे. लॉकडाऊनमध्ये त्याला ही कल्पना सुचली. सर्वप्रथम त्याने हरियाणा, पंजाबहून मारुती 800 ची गिअर बॉक्स, दुचाकीचे इंजिन आणि ट्रॅक्टरचे आवश्यक भाग आणले. त्याचबरोबर त्याच्याजवळील जुन्या एका मोटारसायकलच्या इंजिनचा वापर करून त्याने हा मिनी ट्रॅक्टर तयार केला आहे. हा ट्रॅक्टर बनविण्यासाठी त्याला पाच महिन्याचा कालावधी लागला. या ट्रॅक्टरसाठी त्याला साधारणपणे 38 ते 40 हजार रूपयांपर्यंत खर्च आला. या ट्रॅक्टरमध्ये 125 सीसी बाईक इंजिन आहे. जे 5 क्विटलपर्यंतचे वजन उचलू शकतो. हे ट्रॅक्टर जनावरांसाठी चारा आणण्यास व आदि कार्यास अत्यंत उपयुक्त आहे. संदर्भ – कृषी जागरण, 16 सप्टेबर 2020 यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
241
19
संबंधित लेख