अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना!
लिंबूवर्गीय फळझाडांवर रस शोषक पतंग व फळमाशी या दोन मुख्य किडींमुळे सर्वाधिक फळगळ होते. या किडीमुळे सर्वाधिक फळगळ सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. किडींमुळे होणारी फळगळ रोखण्यासाठी फुले येतेवेळी सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास, डायमेथोएट २ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली प्रति लिटर फवारणी करावी . १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क ५%किंवा निम तेल @ १० मिली प्रति लिटर पाणी किंवा ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम@ २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
42
6
संबंधित लेख