कृषी वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; भाड्याने मिळणार कृषी अवजारे!
• आजघडीला शेती क्षेत्रात आधुनिक अवजारांचे महत्त्व वाढले आहे. प्रामुख्याने वेळ आणि पैशांची बचत करणारी कृषी अवजारे ही आधुनिक शेतीसाठी अत्यावश्यक बनली आहेत. मात्र, छोट्या शेतकऱ्यांना ही कृषी अवजारे वेळेवर उपलब्ध होणे अडचणीचे ठरते. • त्यांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आणखी आहे. सरकारने देशभरात स्थापन केलेल्या ४२००० कस्टमर हायरिंग सेंटरमधून ही अवजारे भाड्याने शेतकरी घेऊ शकणार आहेत. कृषी अवजारे शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध व्हावीत यासाठी लागू केलेली ही योजना वरदानच ठरणार आहे. • केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँक स्थापन केली आहे. • याअंतर्गत सरकारने देशभरात ठिकठिकाणी ४२००० कस्टमर हायरिंग सेंटर स्थापन केले आहेत. दहा लाखांची शेती अवजारे या योजनेसाठी ठेवण्यात आले आहेत. या सगळ्यामध्ये 80 टक्के रक्कम हे सरकार भरणार आहे. म्हणजे 10 लाख रुपयांपैकी आठ लाख रुपयांची सब्सिडी दिली जाईल. उरलेली २० टक्के रक्कम हे शेतकरी स्वतः किंवा शेतकऱ्यांचा गट बँकेद्वारे कर्ज घेऊन जमा करू शकतात. • या केंद्रांतून छोट्या शेतकऱ्यांना भाड्याने आधुनिक कृषी अवजारे मिळतील. म्हणजेच शेतकऱ्यांना ८ लाख रुपयांपर्यंत मदत मिळेल. योजनेसाठी असा कराल अर्ज - ज्या शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठीच्या अनुदानासाठी अर्ज करायचा असेल, त्या शेतकऱ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएफसी) जावे लागेल. अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रातील कोणत्याही ई-मित्र कीऑसवर जाऊन अर्ज करता येईल. त्यासाठी नाममात्र शुल्क द्यावे लागते. आवश्यक कागदपत्रे - योजनेसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. ती अशी आपण जे कृषी उपकरण खरेदी केले आहे त्याचे बिल, आधारकार्ड, आपला फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स. संदर्भ - १४ सप्टेंबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
163
15
संबंधित लेख