व्हिडिओअ‍ॅग्रोवन
पहा, पंचगव्य म्हणजे काय? तयार करण्याची कृती व वापर...
पंचगव्य 'पंच’ म्हणजे पाच आणि ‘गव्य’ म्हणजे गायी पासून (देशीगायीपासून) उत्पन्न होणारे पदार्थ. ह्यावरून गोमूत्र, गोमय (शेण), गोरस (दूध), गोदधी (दही), गोघृत (तूप) ह्या पदार्थांच्या मिश्रणापासून तयार होते ते पंचगव्य गायीपासून प्राप्त होणाऱ्या पाच पदार्थांपासून बनविले जाणारे द्रावण म्ह्णून यास पंचगव्य असे संबोधण्यात येते. हे एक सेंद्रीय द्रावण आहे. जमीनीत आवश्यक जीवाणूंची वाढ, त्याद्वारे पिकाच्या उत्पादन व गुणवत्तेत वाढ, जमीनीची वाफसा स्थिती टिकवून ठेवणे, तसेच पिकात रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचे अद्भुत सामर्थ्य यात आहे. तयार होण्यासाठी लागणारा कालावधी जरी थोडासा जास्त असला तरी सहज उपलब्ध होणाऱ्या संसाधनांमुळे बवण्यास सोपी व स्वस्त अशी ही निविष्टा आहे. याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन मराठी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
100
10
संबंधित लेख