कृषी वार्ताकृषी जागरण
आता; फक्त ५ ते १० टक्के रक्कम भरा अन् शेतात बसवा सौर पंप!
"देशातील वीज संकटाला सामोरे जाणारे क्षेत्र लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान अर्थात कुसुम या योजनेची घोषणा केली. याअंतर्गत सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सिंचनासाठी वापरले जाणारे सर्व डिझेल व इलेक्ट्रिक पंपांचा वापर घटवण्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत, यासह सिंचन झाल्यानंतर शिल्लक असलेल्या विजेपासून शेतकरी पैसा कमावू शकतील. केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा फायदा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होईल. एक, त्यांना सिंचनासाठी विनामुल्य वीज मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांनी अतिरिक्त वीज बनवून ग्रीडला पाठविली तर त्यातून त्यांचे उत्पन्न वाढेल. याशिवाय सौर उर्जा उपकरणे बसविण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ १0% रक्कम द्यावी लागेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून देण्यात येईल. कुसुम योजनेंतर्गत बँका 30 टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतील. त्याच वेळी, सरकार सौर पंपच्या एकूण खर्चाच्या ६0% शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देईल. कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १) अर्जदाराने आधी अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/solar/ वर जावे. २) त्यानंतर होम पेजवर अर्ज करण्यासाठी क्लिक करा ३) आता तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल. ४) अर्जदारास त्याची वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल, जसे की त्यांची वैयक्तिक माहितीः – मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा. ५) ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. ६) आता कुसुम सौर योजनेंतर्गत भरलेला फॉर्म जमा करा. संदर्भ - ९ सप्टेंबर २०२० कृषी जागरण, "
282
64
संबंधित लेख