अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा लागवडीविषयी माहिती!
बटाटा पिकास थंड हवामान मानवते. त्यामुळे बटाटा लागवड हि सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत करावी. लागवडीसाठी मध्यम पोयट्याची व चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. खोडाचा तसेच कंदाचा चांगला विकास होऊन अधिक उत्पादन घ्येण्यासाठी लागवड गादीवाफा तयार करून करावी. लागवडीसाठी बाजाराच्या मागणीनुसार योग्य वाणांची निवड करावी. प्रक्रिया उद्योगासाठी बटाटा लागवड करावयाची असल्यास कुफ्री चिपसोना १, कुफ्री चिपसोना २, कुफ्री हिमसोना, कुफ्री फ्रायसोना, लेडी रोसेटा, संतना, सर्फोमेरा यांसारख्या वाणांची निवड करावी. तसेच भाजीसाठी वापरला जाणारा बटाटा लागवडीसाठी कुफ्री बादशाह, कुफ्री लवकर, कुफ्री पुखराज, कुफ्री चंद्रमुखी, कुफ्री ज्योती, कुफ्री लालिमा यांसारख्या वाणांची निवड करावी. लागवडीसाठी एकरी ५०० ते ७०० किलो निरोगी व प्रक्रिया केले बेणे वापरावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
139
68
संबंधित लेख