अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकातील करपा रोगाचे नियंत्रण!
या रोगाची सुरवात कोवळ्या पानांवर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात. कालांतराने हे ठिपके एकमेकात मिसळून पान करपल्यासारखे दिसते. यामुळे पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते परिणामी पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर याचा परिणाम दिवसुन येतो. यामुळे या रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते. नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @२५ ग्रॅम + सुडोमोनास @२५ ग्रॅम या जैविक बुरशीनाशकांची एकत्र मिसळून प्रति पंप फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
124
55
संबंधित लेख