अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकातील 'करपा' रोगावर उपाययोजना!
हा रोग दोन प्रकारच्या बुरशींमुळे होतो. १. कोलॅटोट्रीकम कॅपसीसी व २. टॅफरीन मॅक्युलन्स. पहिल्या प्रकारच्या बुरशीमुळे ठिपक्यांचे आकार लंब गोलाकार असून वेगवेगळ्या आकाराचे दिसून येतात. ठिपक्यांचा मध्यभाग पांढरट जांभळ्या रंगाचा असून कडेने विटकरी रंगाचे ठिपके दिसून येतात. हे ठिपके एकमेकांत मिसळून वाढत जावून संपूर्ण पान वाळून जाते. दुस-या प्रकारात पानांच्या वरच्या पृष्ठभागावर असंख्य लहान, गोलाकार किंवा ता-यांसारखे लाल ठिपके तयार होतात. ठिपक्यांच्या मध्यभागी बुरशीची काळी वर्तुळाकार फळे रचल्यासारखी दिसतात. नंतरच्या काळात ठिपक्यांच्या सभोवताली पिवळी कडा तयार होते. असंख्य ठिपके तयार होत असल्यामुळे संपूर्ण पान लाल रंगाचे होवून वाळून जाते. यामुळे पानांमध्ये अन्न तयार करण्याच्या क्रियेत अडथळा येतो व याचा पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी अझोक्झिस्ट्रोबीन १८.२% + डायफेंकोनॅझोल ११.४% एससी @१ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
67
46
संबंधित लेख