कृषी वार्ताकृषीनामा
ट्रॅक्टर खरेदीसाठी आता सरकार देतंय २५ ते ३५ टक्के अनुदान!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्या बाबद घोषणा पूर्वीच केली आहे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्यास आधुनिक कृषी उपकरण्यांची महत्त्वाची भूमिका असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कृषी उन्नती योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपक्रम सुरू केला आहे. त्यावेळी योजनेसाठी ७,५०० कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला होता. तर गेल्या दोन वर्षात या निधीतून पूर्ण रक्कम खर्ची पडली नव्हती. या वर्षाच्या अखेरी या निधीतले २,९०० कोटी रुपये शिल्लक राहिले आहे तसेच या योजने अंतर्गत होणाऱ्या एकूण निधीपैकी ६० टक्के रक्कमेची तजवीज केंद्र सरकारने केली असून उरलेली रक्कम राज्य सरकार देणार आहे. राज्य सरकारने २० ऑगस्ट उर्वरीत रक्कमेतील १,७०० कोटी रुपये इतका निधी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी देण्याचे ठरवले आहे. यापैकी १,२०० कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणार असून, उरलेली रक्कम राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. या निधीचे वितरण फक्त अनुसूचित जातीप्रवर्गालाच व्हावे याची दक्षता घेण्याची सूचना राज्य सरकरने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निधीचे वाटप थेट लाभ हस्तांतरण सुविधेद्वारे होणार आहे असे सांगितले आहे . अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आत सरकार कडून ३५ क्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच इतर शेती उपकरणांच्या खरेदीसाठी सरकार कडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. इतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार कडून २५ टक्के आणि इतर शेती उपकरणांच्या खरेदीसाठी ४० टक्के अनुदान देण्यात येते. संदर्भ - कृषीनामा २३ ऑगस्ट २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
199
37
संबंधित लेख