अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खास, आपल्या पिकातील अधिक फुलधारणेसाठी योग्य व्यवस्थापन!
शेतकरी बंधूंनो, आपल्या कोणत्याही पिकामध्ये अधिक फुलधारणा व फळधारणा झाल्यास अधिक उत्पादन मिळते. यासाठी पीक फुलधारणा अवस्थेत असताना योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन केल्यास, फुलगळ समस्या येत नाही. यासाठी आपण मिरची, टोमॅटो, वांगी, भेंडी, वेलवर्गीय पिके यांच्या चांगल्या वाढीसाठी १२:६१:०० @१.५ किलो प्रति एकर प्रति २ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे. तसेच अधिक फुलधारणेसाठी अमिनो ऍसिड @२ मिली आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. त्यानंतर ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम @१ ग्रॅम + बोरॉन @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
115
30
संबंधित लेख