अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरीप कांदा लागवडीचे नियोजन!
कांदे जमिनीच्या खाली २५ सेंमीपर्यंत वाढतात. त्यामुळे उत्तम निचऱ्याची हलकी ते माध्यम भारी जमिनीची निवड करावी. नांगरणी व वखरणी करून शेतात २० ते २५ टन शेणखत टाकावे. कांदा पुनर्लागवड करण्यासाठी अंदाजे ४० ते ४५ दिवसांची रोपे असावीत. लागवड शक्यतो ठिबकवर असल्यास गादीवाफा व पाटपाण्यावर असल्यास सपाट वाफ्यावर करावी. दोन ओळीतील अंतर १५ सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. रोपांचा शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा. लागवडीपूर्वी रोपे शिफारस केलेल्या कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
102
28
संबंधित लेख