योजना व अनुदानआपले सरकार डीबीटी पोर्टल
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना!
o उद्देश : जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. o धोरण : कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे. o अनुदान या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल: १) ट्रॅक्टर २) पॉवर टिलर ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे ४) बैल चलित यंत्र/अवजारे ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे ६) प्रक्रिया संच ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे १०) स्वयं चलित यंत्रे o भाडे तत्वावरील सुविधा केंद्र: १) कृषि अवजारे बँकेची स्थापना २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना o पात्रता:- • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा. • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक. • फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार. • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक. • एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील. o आवश्यक कागदपत्रे:- • आधार कार्ड • ७/१२ उतारा • ८ अ दाखला • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी ) • स्वयं घोषणापत्र • पूर्वसंमती पत्र
संदर्भ:- https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Home/Index हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
315
34
संबंधित लेख