अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसामधील पोक्काबोईंग समस्या आणि उपाय!
सध्या खूप ठिकाणी ऊस पिकात पोक्का बोईंग या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर उसाच्या वरच्या बाजूची कोवळी पाने चुरगळून पीळ पडल्यासारखी गोळा होण्यास चालू होतात व पाने आकाराने लहान राहतात. कालांतराने शेंड्याकडील पानांवर लालसर चट्टे पडून उसाची कांडी वरून खालपर्यंत सुकायला चालू होते. हा रोग सुरुवातीला हवेमार्फत तसेच रोगी बेणे लागवडीसाठी वापरल्यास व पाण्याद्वारे पसरला जातो. या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीसाठी निरोगी प्रक्रिया केलेले बेणे वापरावे तसेच पिकात प्रादुर्भाव आढळून आल्यावर कॉपर ऑक्सी क्लोराईड घटक असणारे धानुकोप ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात पहिली फवारणी करावी तसेच ८ दिवसांच्या अंतराने कार्बेन्डाझिम घटक असणारे धानुस्टीन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन दुसरी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
19
8
संबंधित लेख