सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकामध्ये 'सल्फर'चे महत्व!
 गंधकाचे फायदे:- • सोयाबीन पिकात गंधक हे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते. • गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते. • अतिशय महत्वाचे म्हणजे गळितधान्यामध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी गंधकाचा उपयोग होतो. एकंदरीत उत्पादन वाढण्यास मदत करते.  कमतरतेची लक्षणे:- • गंधकाची जास्त कमतरता असल्यास पूर्ण झाड पिवळे होऊन परिपक्व होण्यापूर्वी ते गळून जातात. फुले कमी होऊन फळधारणा कमी होते. • नवीन येणारी पाने आणि पालवी पिवळी पडू लागते, देठ आखुड राहतात. • द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरिकरणाच्या गाठीचे प्रमाण कमी होते. • शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत. उत्पादनामध्ये घट येते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
126
35
संबंधित लेख