कृषी वार्ताकृषी जागरण
SBI' बँकची योजना: शेतकऱ्यांना तात्काळ अ‍ॅग्री गोल्ड लोन!
लाॅकडाऊनमुळे संंकटात सापडलेल्या बळीराजाला शेतीची कामे करण्यासाठी तातडीने पैस देणारी सोनं तारण कर्ज योजना भारतीय स्टेट बँकेने जाहीर केली आहे. यामुळे शेतकऱ्याची पैशांची चिंता मिटणार आहे. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची परिस्थिती असून, अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. असे असतानाही केंद्र सरकारने शेतीविषयक कामांना सवलत दिली आहे. मात्र, सद्य परिस्थितीत विविध ठिकाणी पैसे अडकल्याने शेतकरीही संकटात आला आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्टेट बँकेने अ‍ॅग्री गोल्ड लोनची सुविधा देऊ केली आहे. या माध्यमातून शेतकरी आपल्याकडील सोने बँकेत तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेऊ शकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सुविधेचा लाभ पाच लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. योजना नेमकी काय? १) स्टेट बँकेच्या या योजनेंतर्गत कुणीही शेतकरी कर्ज घेऊ शकणार आहे. त्यासाठी त्याला केवळ सोने गहाण तारण म्हणून ठेवावे लागणार आहेत. २) जो शेतकरी कर्ज काढू इच्छितो, त्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक असणार आहे. नावावर शेती असल्याचा पुरावा बँकेत जमा करावा लागणार आहे. या विशेष ३) योजनेचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाचा घेता यावा, यासाठी ही अट घालण्यात आली आहे. ४) कमी व्याज दराने व्याज आकारण्यात येणार आहे. ५)जर तुम्हाला एसबीआय अ‍ॅग्री गोल्ड कर्ज घ्यायचा असेल तर तुम्हाला जवळच्या एसबीआय शाखेत जावे लागेल. ६) याशिवाय शेतकरी 'योनो'(YONO) अ‍ॅपद्वारे एसबीआय गोल्ड कर्जासाठीही अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला एसबीआय https://sbi.co.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. शेतजमीन नसल्यास? कोणत्याही व्यक्तीच्या अथवा शेतकऱ्याच्या नावावर शेत नसेल मात्र, ट्रॅक्टर असेल आणि तो त्याच्या नावावर असेल तरीही सोने तारण ठेवून कर्ज घेता येऊ शकणार आहे. संबंधिताला केवळ ट्रॅक्टर आपल्या नावावर असल्याचे सिद्ध करणाऱ्या आरसी बुकची प्रत बँकेत जमा करावी लागणार आहे. संदर्भ - कृषी जागरण १२ जुलै २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
171
11
संबंधित लेख