सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान!
• ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक असून ३ हंगामात त्याची लागवड केली जाते. खरिफ हंगामात मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट पर्यंत केली जाते. • भरघोस उस उत्पादनाची पंचसूत्री म्हणजे योग्य लागवडीचे अंतर, फुटव्यांची संख्या, खतांचे व पाण्याचे नियमित नियोजन, वेळच्या वेळी तण व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन या सगळ्या बाबी आहेत. • सुरुवातीला जमिनीची चांगली मशागत करून योग्य प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. नंतर लागवडीसाठी दोन सऱ्यांमधील अंतर ५ ते ६ फूट व दोन डोळ्यांमधील अंतर १ ते १.५ फूट ठेवावे. • ऊस लागवडीसाठी को ८६०३२, व्हीएसआय ८००५, फुले २६५, यांसारख्या प्रसिद्ध जातींचा वापर करावा. • सुरुवातीच्या काळातील जमिनीतील कीड आणि रोग नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी उसाच्या कांड्यांची प्रक्रिया करणे आवश्यक आहे यासाठी २०० लिटर पाण्यामध्ये २०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (धानुस्टीन) अधिक इमिडाक्लोप्रिड ७० % @ ७५ ग्रॅम एकत्र करून बेणे १५ मिनिटांसाठी यामध्ये बुडवून काढावी नंतर लागवड करावी. तयार केलेल्या द्रावणात २ ते ३ वेळाच आपण टिपरे बुडवू शकतो, नंतर हे द्रावण पाण्याद्वारे जमिनीतून सोडून द्यावे. • ऊस पिकाची चांगली उगवण होऊन जोमदार फुटव्यांची जमिनीतून २०० किलो सुपर फॉस्फेट, ७५ किलो पोटॅश, ५० किलो युरिया, गंधक १० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो आणि २५ किलो कार्बोफ्युरॉन कीटकनाशक एकरी द्यावे. • उसाची लागण झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांत तन नियंत्रणासाठी मेट्रिब्युनझिन एकरी ६०० ग्रॅम याप्रमाणे घेऊन तण उगवणीपूर्वी फवारणी घ्यावी. • पुढे ऊस उगवून आल्यानंतर जोमदार वाढीसाठी आणि फुटव्यांची पिकात विद्राव्ये खत १९:१९:१९ @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. • तसेच लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी पिकात हलकी मातीची भर लावून खतांची योग्य मात्रा द्यावी. जेणेकरून पिकात हवा खेळती राहून फुटव्यांची आणि मुळीचा विकास होईल. • ऊस पिकात खोडकीड, हुमणी, वाळवी, लोकरी मावा, पांढरी माशी, लाल कूज, चाबूक कानी, गवताळ वाढ, तांबेरा यांसारख्या कीड व रोग आणि फेरस, सल्फर, यांसारख्या अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. त्यामुळे कीड रोग आणि खत व्यवस्थापन याकडे सुरवातीपासूनच लक्ष द्यावे. यासाठी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
179
33
संबंधित लेख