आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब फळांवरील बुरशीजन्य ठिपक्यांचे नियंत्रण!_x000D_
फळांवर सुरुवातीस तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. नंतर ते ठिपके आकाराने वाढत जाऊन काळे पडतात आणि त्यावर बुरशीची काळी वाढ दिसून येते. याचे प्रमाण वाढत जाऊन फळ कुजण्यास सुरुवात होते. रोगट फळे बोटांनी दाबली असता ती दबली जातात व आंबूस वास येतो. आतील दाणे रंगहीन होतात._x000D_ या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड २.५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सर्व फळांवर चांगले द्रावण बसेल अशा पद्धतीने फवारणी करणे आवश्यक आहे. सोबतच प्रादुर्भाव ग्रस्त फळे तडकण्याचे प्रमाण वाढू नये यासाठी कॅल्शिअम नायट्रेट १० किलो प्रति एकरी ठिबकद्वारे द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
67
2
संबंधित लेख