आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकात रोपाची संख्या योग्य राखण्यासाठी नांग्या भरणी आवश्यक!
कापूस बियाणे सर्वसाधारणपणे ५ ते ७ दिवसात उगवतात, ज्या ठिकाणी बी उगवले नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच, तेच सुधारित किंवा संकर बियाणे नांग्या भरण्यासाठी वापरावे व लगेच पाणी द्यावे, किंवा ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर २ ते ३ बिया लाव्याव्यात. या रोपांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेऊन त्यांचे किडीपासून सरंक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. या पॉलिथिन पिशव्यांतील रोपे २० ते २५ दिवसांच्या आतच लावावीत. यामुळे एकूण क्षेत्रातील रोपांची संख्या योग्य राहून याचा उत्पादनासाठी फायदा होतो.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
142
1
संबंधित लेख