आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस लागवडीपूर्वीचे तण नियंत्रण!
कापूस पिकात योग्य वेळेत तण नियंत्रित ठेवले नाही तर खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येते तसेच जास्त प्रादुर्भाव झाल्यास तण नियंत्रित करणे कठीण होऊन जाते. यासाठी कापूस पिकाचे बियाणे लागवड केल्याबरोबर तातडीने पेंडीमिथॅलीन 38.7 % घटक असलेले तणनाशक @ 700 मिली प्रति एकर कोरड्या जमिनीतच फवारणी करावी व त्यानंतर पिकास पाणी द्यावे. पिकात पाणी दिल्यानंतर अथवा जमिनीत ओलावा असताना तणनाशकाचा वापर करणे टाळावा. अन्यथा त्याचा परिणाम उगवून आलेल्या तणांवर न होता उलट पिकात त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
177
0
संबंधित लेख