व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मल्चिंग पेपरचे फायदे!
सध्या उष्णता वाढल्याने पिकास पाण्याची अधिक गरज भासते. त्यामुळे पिकास मल्चिंग पेपरचा वापर केल्यास बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते. बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते. खतांच्या वापरात बचत होते. कारण खतांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो. वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते. जमिनीची धूप थांबते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ व्हिडीओ संदर्भ:- भावीण चावडा_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
25
0
संबंधित लेख