हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
मराठवाडा विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता
दिनांक २६ एप्रिल रोजी महाराष्ट्र सह संपूर्ण हवेचे दाब बदलत आहे आठवड्याचे सुरवातीस महाराष्ट्रवर १००८ हेप्टापास्कल तर उत्तर भारतावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे दक्षिणेकडून,नैऋत्येकडून उत्तर दिशेला वाहण्यास सुरवात होईल दिनांक २७ एप्रिल रोजी दक्षिणेकडे हवेचे दाब आणखी वाढतील हवेच्या दाबात १०१० हेप्टापास्कल इतकी वाढ होईल.
हि स्थिती आगामी मान्सून साठी अनुकूल राहील.ओमेन च्या बाजूस हवेचा दाब अधिक असल्यामुळे व बंगालच्या उपसागरात हवेचा दाब कमी होत असल्यामुळे तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन विदर्भ ,मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणात ढग वाहून आणत असल्यामुळे तेथे पाऊस पडत आहे.वायव्य कडून येणारे थंड वारे त्यात मिसळले जात असल्यामुळे काही भागात गारपीठ होत आहे .हि स्थिती या आठवड्यात शक्य आहे.पूर्व मोसमी पावसाचा फायदा शेतीच्या पूर्व मशागतीसाठी नक्की होईल या आठवड्यात मराठवाडा,विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे._x000D_ संदर्भ -डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ)_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा._x000D_
207
0
संबंधित लेख