जैविक शेतीकृषि जीवन
शेतीमधील जैविक खतांचा प्रभावी वापर
• रायझोबियम जीवाणू कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन गाठी बनवतात. मुळावर वाढलेले जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. कडधान्य पिकाच्या म्हणजेच हरभरा, वाटाणा, तूर, भुईमूग, सोयाबीन, चवळी, मूग यांसारख्या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी रायझोबियम @ २५०-३०० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे त्याप्रमाणात बीज प्रक्रियेसाठी वापरावे. • तसेच एकदल व तृणधान्य पिके उदा. ज्वारी, मका, कापूस, बाजरी, इत्यादी पिकांना बीजप्रक्रियेसाठी ऍझोटोबॅक्‍टर @२५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात गुळासोबत वापरावे.  जीवाणू खते वापरण्याच्या पद्धती:- • बीजप्रक्रिया: २५० ग्रॅम जीवाणू खते १० किलो बियाणास पुरेसे होतात. बियाणाच्या प्रमाणानुसार बीजप्रक्रियेसाठी पुरेसे पाणी घेऊन त्यात वरील प्रमाणामध्ये जीवाणू खते मिसळावीत. एकरी किंवा हेक्‍टरी लागणारे बियाणे फरशी, ताडपत्री, अथवा गोणपटावर पसरावे. त्यावर वरील द्रावण शिंपडून हलक्‍या हाताने एकसारखे मिसळावे. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये सुकवावे. बियाणे सुकल्यानंतर लगेचच पेरणी करावी. कोणत्याही रासायनिक खतांबरोबर जीवाणू खते किंवा बियाणे मिसळू नयेत.  मातीद्वारे ट्रायकोडर्माचा वापर:- • ट्रायकोडर्मा हि विविध पद्धतीद्वारे वापरता येते. उदा. बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी, पिकांवर फवारणीद्वारे आणि सेंद्रिय खत निर्मितीकरिता उपयोग होतो. तसेच ट्रायकोडर्मा वापर आपल्याला सर्व पिकांमध्ये करता येतो. मातीमधून देण्यासाठी १ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा पावडर २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून एक एकर क्षेत्रातील मातीत मिसळावे. त्यानंतर लगेच पाणी द्यावे. संदर्भ:- कृषी जीवन हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
79
14
संबंधित लेख