हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
महाराष्ट्रात उष्ण हवामानासह पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील बहुतांशी भागात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस तर काही भागात ४४ अंश सेल्सिअस पर्यंत वाढणे शक्य असून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तापमानात गतीने वाढ होत जाईल. रात्रीचे तापमान कधिक राहील. यामुळे पुढील काळात प्रखर उष्णता जाणवू लागेल.दिनांक एप्रिल रोजी संपूर्ण नैऋत्य दिशेकडून हवेचे दाब वाढतील हि बाब मान्सूनचा रस्ता तयार करण्यासाठी ऊपयुक्त ठरतील. या वर्षी प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता - कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात राहील. तसेच हे या पूर्वीच्या ५० वर्षांपैकी वेगळे वर्ष असून प्रदूषण विरहित हवा असल्याने मान्सून वेळेपूर्वी दाखल होणे शक्य असून चांगल्या पावसाची शक्यता आहे. एकूणच या वर्षाची हवामान स्थिती अनुकूल आहे. • दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र:- कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे व नगर या जिल्ह्यात या आठवड्यात पावसाची शक्य आहे. कोल्हापूर व सांगली २५-४० मी.मि तर उर्वरित जिल्ह्यात १३ मी.मि, मात्र सोलापूस जिल्ह्यात अल्पशा ३ मी.मि पावसाची शक्यता आहे. • कोकण:- कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवस २५ मी.मि तर काही दिवस ८-१५ मी.मि पावसाची शक्यता आहे. • उत्तर महाराष्ट्र:- नाशिक व धुळे जिल्ह्यात ४ ते ६ मी.मि पावसाची शक्यता आहे. सर्व जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५-२६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. • मराठवाडा:- दिनांक २१ एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात ३-७ मी.मि पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. • पश्चिम विदर्भ:- अमरावती जिल्ह्यात दिनांक २० एप्रिल रोजी ४ मी.मि पावसाची शक्यता आहे. बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर किमान २५-२६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा तशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील. • पूर्व व मध्य विदर्भ:- यवतमाळ, वर्धा व नागपूर या जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर किमान २५-२६ अंश सेल्सिअस राहील.
 शेतकरी बंधूंनी वरील आपल्या महाराष्ट्राच्या हवामानाच्या अंदाजानुसार पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या शेतकरी बंधू १) जमिनीची पूर्व मशागत करताना नांगराची पाळी, कुळवाच्या पाळी, सपाटीकरण व बांध बंदिस्ती करावी. २) शेततळ्याची कामे पूर्ण करावीत. ३) द्राक्षे पिकाची खरड छाटणी करावी. इ. कामे करावीत._x000D_ संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ)_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा._x000D_
255
0
संबंधित लेख