सल्लागार लेखकृषक जगत
ट्रॅक्टरची देखभाल
ट्रॅक्टर बर्‍याच प्रकारच्या छोट्या उपकरणांचा बनलेला असतो ज्याचा वेळेवर देखभाल न केल्यास कामावर मोठा परिणाम होतो, जसे ट्रॅक्टरची कार्यक्षमता कमी होते, जास्त इंधनाची गरज पडते, तेल गळती होणे, यांमुळे वेळोवेळी ट्रॅक्टरची देखभाल करणे खूप महत्वाचे आहे, यापैकी काही टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
 दर ८ ते १० तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी -_x000D_ १) इंजिनमधील (सम्पमधील) व एअर क्‍लिनरमधील तेलाची पातळी तपासावी. _x000D_ २) रेडिएटर व बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासावी. _x000D_ ३) जर ट्रॅक्‍टरचे काम धुळीमध्ये असेल तर एअर क्‍लिनरमधील तेल बदलावे. _x000D_ ४) डिझेल लिकेज आहे का ते पाहावे._x000D_  दर आठवडा किंवा ५० ते ६० तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी - _x000D_ १) फॅन बेल्टचा ताण योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी. _x000D_ २) गिअर बॉक्‍समधील तेलाची पातळी तपासावी. _x000D_ ३) ट्रॅक्‍टर चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. _x000D_ ४) बॅटरी व मोटर यांची सर्व कनेक्‍शन घट्ट बसवावीत. _x000D_ ५) इंधन फिल्टर (डिझेल फिल्टर)मध्ये साचलेले पाणी बाहेर काढावे._x000D_  दर ४०० ते ५०० तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी - _x000D_ १) पुढील चाकाचे हब ग्रीसिंग करावे. _x000D_ २) रेडिएटरमधील पाणी काढून तो स्वच्छ करून घ्यावा व पुन्हा नवीन पाणी भरावे. _x000D_ ३) क्‍लच तपासून घ्यावा. _x000D_ ४) आवश्‍यकतेनुसार ब्रेक ऍडजस्ट करून घ्यावेत._x000D_ ५) अधिकृत विक्रेता किंवा अनुभवी मेकॅनिकद्वारे इंजेक्टर आणि डिझेल पंप तपासा._x000D_ संदर्भ:- कृषीजगत_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. _x000D_
22
0
संबंधित लेख