सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस लागवडीसाठी महत्वाचे नियोजन
• ऊसासोबतच कापूस हे देखील महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक आहे. त्यामुळे कापूस लागवड करताना पुढील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे • अगोदर लागवड केलेल्या शेतात पुन्हा कापूस घेऊ नये म्हणजेच पिकाची फेरपालट करावी जेणेकरून जमिनीचा पोत खराब होत नाही तसेच कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. • तसेच कापूस लागवड मध्यम ते भारी तसेच चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. शक्यतो हलक्या जमिनीत कापूस पिकाची लागवड करणे टाळावे अन्यथा पाण्याचा ताण पडून उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता असते • जमिनीची मशागत करताना उन्हाळ्यात एक खोलगट नांगरणी करावी व जमीन उन्हात चांगली तापून द्यावी त्यानंतर कापूस लागवडीपूर्वी वखरणी करताना शक्य झाल्यास जास्तीत जास्त सेंद्रिय खत म्हणजेच शेणखताचा वापर करावा. • सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाणांची निवड यावर तर खरे उत्पादन अवलंबून असते. आपल्या जमिनीचा प्रकार, पाण्याची सुविधा, वाणाचा कालावधी, पुनर्बहराची क्षमता, कीड व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता तसेच बोंडांचे वजन, धाग्याची लांबी आणि रब्बी हंगामातील पिकाचे नियोजन, आंतर पीक या सगळ्या बाबी लक्षात ठेवून वाणांची निवड करावी. • कापूस लागवड करताना लवकर येणाऱ्या वाणांसाठी ३ * ०.५ किंवा ३ * १ फूट, मध्यम कालावधीच्या वाणांसाठी ४* १ किंवा ४* २ फूट तसेच उशिरा येणाऱ्या वाणांसाठी ५ * १ किंवा ५ * २ फूट अंतर राखावे. • बागायती कापूस लागवड हि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून मधील पहिल्या पंधरवड्यात करावी. जिरायती कापूस लागवड ही चांगला पाऊस सुरुवात झाल्यावरच करावी. • कापूस पिकातील तण नियंत्रणासाठी कापूस पिकाचे बियाणे लावल्यावर पिकास पाणी देण्यापूर्वी २४ तासांच्या आतमध्ये पेंडीमिथॅलीन ३८.७ % सीएस तणनाशक @ ७०० मिली प्रति एकर क्षेत्रावर फवारणी करावी व त्यानंतर शेतात पाणी द्यावे. हे तणनाशक गवताच्या बियाण्यावर काम करते जेणेकरून गवत उगवून येत नाही. परंतु तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी पाऊस झालेला असेल अथवा पिकास पाणी दिले असेल तर तणनाशकाचा वापर करणे टाळावा. • उभ्या पिकात २, ४ डी सारख्या तणनाशकांचा वापर करणे टाळावा. अन्यथा पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन पिकाचे नुकसान होते. • पीक लागवड केल्यानंतर खतांचे व पाण्याचे चांगले नियोजन तसेच रसशोषक कीड, मर, लाल्या रोग व बोन्ड अळी यांचे सुरुवातीपासून नियोजन करावे. रसशोषक किडींसाठी पिवळे, निळे चिकट सापळे, बोन्ड अळी साठी कामगंध सापळे सुरुवातीपासूनच वापरावे. • खतांमध्ये मुख्य अन्नद्रव्यांसोबतच दुय्यम (कॅल्शिअम मॅग्नेशिअम सल्फर) व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा. • मर रोगासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या खतांच्या मात्रासोबतच कॉपर ऑक्सि क्लोराईड आणि कार्बेन्डाझिम यांसारखे बुरशीनाशक जमिनीतून द्यावे. • जेणेकरून कापूस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन भेटेल
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
218
3
संबंधित लेख